top of page
Writer's pictureMahannewsonline

महिला बँक अधिकाऱ्याची आत्महत्या; IPS अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

अयोध्या : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) महिला अधिकारी श्रद्धा गुप्ता यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रद्धाने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहीली होती. या मध्ये तिने आपल्या आत्महत्येला आयपीएस अधिकारी आशिष तिवारी, हेड कॉन्स्टेबल अनिल रावत आणि विवेक गुप्ता हे जबाबदार असल्याचे लिहिले होते. श्रद्धाच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीएस आशिष तिवारीसह तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रद्धा गेल्या पाच वर्षांपासून अयोध्येतील पंजाब नॅशनल बँकेत काम करत होती. विवेक गुप्ता नावाच्या व्यक्तीसोबत श्रद्धाचे लग्न ठरले होते. पण विवेकची वागणूक चांगली नसल्यामुळे श्रद्धाने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या विवेक श्रद्धाला त्रास देत होता. तो त्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धाला फोन करायला लावायचा आणि त्रास देत असल्याचे श्रद्धाच्या कुटुंबीयांनी सांगितले.

दरम्यान, अयोध्येतील पंजाब नॅशनल बँकेच्या महिला कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आयपीएस अधिकाऱ्याचे नाव असणे, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले. या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

bottom of page