top of page

संतापलेल्या शेतकऱ्यांनी केला भाजपा आमदारावर हल्ला; कपडेही फाडले...

मागील कित्येक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांची सहनशिलता आता संपत आली आहे, असं दिसत आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांच्या एका गटाने भाजपा आमदार आमदार नारंग यांच्यावर हल्ला करून त्यांचे कपडे फाडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आमदार नारंग यांची शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका करत सुरक्षित ठिकाणी नेले.

मागील काही महिन्यांपासून पंजाबमधील भाजपा नेते शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करताना दिसत आहे. त्यातच आता पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये भाजपा आमदार अरुण नारंग यांच्यावर शेतकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. अबोरचे आमदार नारंग हे शनिवारी स्थानिक नेत्यांसह मलोटमध्ये पत्रकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेराव घातला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या दिशने शाही फेकली. त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आमदार यांचे कपडेही फाडले.


दरम्यान आमदार नारंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी निषेध केला आहे. शिरोमणी अकाली दलानेही नाराजी व्यक्त करत घटनेचा निषेध केला आहे.


bottom of page