top of page

VIDEO पाहा : पोलार्डने लगावले एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स

Updated: Mar 6, 2021

पोलार्ड बनला तिसरा खेळाडू

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजनं 41 बॉल आणि चार विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड यानं अकिला धनंजय याच्या एका ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावत रेकॉर्ड केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पोलार्ड हा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी युवराज सिंह आणि हर्षल गिब्ज यांनी ही कामगिरी केली होती. युवराजनं टी-20 क्रिकेटमध्ये तर गिब्जनं वन-डे क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड केला होता.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 132 रनचं आव्हान होतं. पोलार्ड मैदानात आला तेंव्हा वेस्ट इंडिजच्या चार विकेट्स गेल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स लगावले. पोलार्डनं या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 38 रन काढले. या कामगिरीबद्दल पोलार्डला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आले. विशेष म्हणजे पोलार्डनं हे सिक्स मैदानाच्या वेगवेगळ्या दिशेला न मारता एकदम सरळ लगावले. युवराज सिंहनं इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला 6 सिक्स लगावले होते. त्यानंतर पोलार्डनं तब्बल 14 वर्षांनी या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.


bottom of page