top of page
Writer's pictureMahannewsonline

फॅशन स्ट्रीटला भीषण आग, लाखोंचे नुकसान

पुणे: मुंबईतील भांडूपमधील ड्रीम्स मॉलला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

फॅशन स्ट्रीट येथे लहान-मोठी कपड्यांची अनेक दुकाने एकमेकांशी चिटकून आहेत. यामुळे मार्केटमधील दुकानांना लागलेली आग लवकर पसरली गेली आणि बघता बघता संपूर्ण मार्केट जळून खाक झाले. आगीचे गोळे दूरपर्यंत आकाशात दिसत होते. तब्बल तीन तासांनी ही आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील जवळपास ५०० हुन अधिक दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. या आगीमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


bottom of page