top of page

VIDEO पाहा : माजी मुख्यमंत्र्यांचा डान्स होतोय व्हायरल

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांची नात सहरइंदर कौर हिचा विवाहसोहळा दिल्लीत पार पडला. या विवाहसोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत अब्दुल्ला यांनी ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’, ‘गुलाबी आंखें जो तेरी देखी’ या गाण्यांवर डान्स केला त्याचबरोबर ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ गाणं लागल्यानंतर फारूख यांनी कॅप्टन अमरिंदर यांना हाताला धरून आणलं आणि त्यांनाही डान्स करायला लावला. या व्हिडीओमध्ये फारूख यांच्यासोबत इतर काही लोकंही नाचताना दिसत आहेत.

या वयातही फारूख अब्दुल्ला यांचा उत्साह पाहून अनेकजण त्यांच्या डान्सवर फिदा झाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही फारूख यांच्यासोबत डान्स करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना डान्स करण्यासाठी बोलवलं. तसेच टाळ्या वाजवून अमरिंदर यांनी अब्दुल्ला यांच्या डान्सचं कौतुकही केलं.

bottom of page