top of page
Writer's pictureMahannewsonline

राष्ट्रपती भवनात घुसखोरीचा प्रयत्न; दोघांना अटक

नवी दिल्ली : येथील राष्ट्रपती भवनामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दारुच्या नशेत असणाऱ्या दोघांनी राष्ट्रपती भवनामध्ये सोमवारी रात्री घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी तिथे तैनात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं. दिल्ली पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या शिवम शर्मा आणि कुसुम राजपूत या दोघांनी हुंडाई आय-२० गाडीच्या मदतीने नॉर्थ एव्हेन्यूवरील गेट क्रमांक १७ वरून राष्ट्रपती भवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि प्रवेश मार्गावर लावलेल्या पोलिस बॅरिकेड्सचेही नुकसान केले.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरक्षेला धोका पोहचवणे, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणे आणि मोटर अधिनियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय.


bottom of page