top of page
Writer's pictureMahannewsonline

४,४,४,४,४,४ ! पहिल्याच षटकात पृथ्वी शॉचा नवा विक्रम

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात झालेल्या आज (गुरुवार)च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृश्वी शॉने पहिल्याच षटकात ६ चौकार ठोकत नवा विक्रम नोंदवला.

जलदगती गोलंदाज शिवम मावीने पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतरच्या सर्व चेंडूवर पृथ्वीने चौकार ठोकले. यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक (१८ चेंडूत) ठरले. पृथ्वीने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. पृथ्वीपूर्वी अजिंक्य रहाणेने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना एका षटकात ६ चौकार ठोकले होते. २०१२च्या हंगामात बंगळुरूचा जलदगती गोलंदाज श्रीनाथ अरविंदविरुद्ध रहाणेने हा कारनामा केला होता. या सामन्यात रहाणेने ६० चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी केली होती.


bottom of page