top of page
Writer's pictureMahannewsonline

T20 वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणारी बक्षिसाची रक्कम आहे....; आयसीसीने केली घोषणा

टी २० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या आणि उप विजेत्या संघाला किती रुपयांचं बक्षीस मिळणार, याबाबत आयसीसीने आज घोषणा केली आहे.

विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल. १० आणि ११ नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ४,००,००० डॉलर्स म्हणजेत ३ कोटी रुपये मिळणार आहेत.

सुपर १२ मधील विजेत्या संघांना बोनस मिळणार आहे. सुपर १२ च्या ३० सामन्यातील विजेत्या संघाला ४० हजार डॉलर्स म्हणजेच ३० लाख रुपये दिले जातील. तर या टप्प्यात नॉकआउट होणाऱ्या संघांना ७० हजार डॉलर्स म्हणजेच ५२.५९ लाख रुपये मिळतील. पात्रता साखळी फेरीतील प्रत्येक विजयाला ३० लाख रुपये मिळणार आहेत. राउंड १ मध्ये बांगलादेश, नामीबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि श्रीलंका देश आहेत. तर आफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, भारत आणि वेस्टइंडिज हे संघ सुपर १२ मध्ये आहेत.


bottom of page