top of page
Writer's pictureMahannewsonline

आ. प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर येथील कॉरंटाईन सेंटरला भेट देवून घेतली समस्यांची माहिती

तात्काळ समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मा. आयुक्त, सोमपा यांना दिले निवेदन

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (रविवार ) जुळे सोलापूर येथील म्हाडा बिल्डींग मधील कोव्हिड-१९ कॉरंटाईन सेंटरला भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून या कॉरंटाईन सेंटरबाबत तक्रारी येत असल्यामुळे आ. प्रणिती शिंदे त्यांनी आज या कॉरंटाईन सेंटरला भेट देवून तेथील समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यांचे निवारण होण्याकरीता सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवदेनाव्दारे मागणी केली.

सोलापूर शहरातील जुळे सोलापूर येथील कॉरंटाईन सेंटरमध्ये असणाऱ्या नागरीकांचे स्वॅब घेतल्यानंतर कोरोना टेस्ट रिपोर्ट 24 तासामध्ये प्राप्त होणे गरजेचे आहे. कॉरंटाईन सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा निकृष्ट व अपूरे असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच नाष्टयाच्या पोह्यामध्ये किडा आढळल्याचे निदर्शनास आले आहे. तरी जेवणाचा दर्जा सुधारुण पुरेशा प्रमाणामध्ये कॉरंटाईन सेंटरमधील नागरीकांना जेवण देणे आवश्यक आहे. कॉरंटाईन सेंटरमध्ये बोअरचे पाणी उपलब्ध असून तेच पाणी पिण्याकरीता देण्यात येत आहे. तरी तेथे पिण्याच्या पाण्याच्या जारची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कॉरंटाईन सेंटरमधील नागरीकांना अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याकरीता आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाव्दारे मागणी केली.



bottom of page