top of page

सासूबाई, मुलाचं दुसरं लग्न करताना त्या मुलीला तरी फसवू नका...

३ वर्षाच्या मुलीला धावत्या रेल्वेमधून फेकून विवाहितेचीही आत्महत्या

औरंगाबाद : आपल्या चिमुकलीला धावत्या रेल्वेमधून फेकून विवाहितेने रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लासूर स्टेशन ते पोटूळ रेल्वे स्टेशनदरम्यान खडकनारळा परिसरात काल (शुक्रवारी ) दुपारी ३ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पूनम गणेश विसपुते (वय २४) तर शांभवी विसपुते ( वय ०३ ) असे माय-लेकीचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी पूनमने भावाला, पतीला पाठवलेल्या मेसेजमध्ये 'सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका,' असे म्हटले आहे. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

२०१८ मध्ये पूनमचे नाशिक जिल्ह्यातील गणेशसोबत लग्न झाले होते. तर गणेश गुजरातमधील नवसारी येथील एका कंपनीत कामाला आहे. दरम्यान, सासरच्या छळाला कंटाळून पूनम सहा महिन्यांपूर्वी आईकडे आली होती. त्यानंतर याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पहाटे पाच वाजता गणेश व सासरची मंडळी औरंगाबादला आली. पण त्यांच्या येण्यापूर्वीच पूनमने आपली तीन वर्षांची मुलगी शंभवीला घेऊन घरातून निघून गेली. तिचा शोध घेत असतानाच शिल्लेगाव हद्दीतील खडकनारळा परिसरात पूनमने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पुनमचा मोबाइल आढळला. शिल्लेगाव पोलिस ठाण्यात घटनची नोंद झाली आहे.

पूनमने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला आणि पतीला एक मॅसेज पाठवला ज्यात तिने म्हटले आहे की, "माझ्या मरणाला मी आणि मीच जबाबदार आहे. यात माझ्या सासरच्यांची चूक नाही. माहेरच्यांची नाही. 'सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका. जगण्यासाठी पैसा लागत नाही, तर आनंद लागतो. आय एम सो सॉरी फॅमिली"


bottom of page