top of page
Writer's pictureMahannewsonline

डॉक्टर दांपत्याची डॉक्टर्स डेच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या

आज देशभरामध्ये डॉक्टर्स डे साजरा करीत असताना पुण्यातील डॉक्टर पती, पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. निखिल शेंडकर आणि अंकिता शेंडकर असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे.

निखिल हे पत्नी अंकितासोबत आझाद नगर, वानवडी येथे राहत होते. काल सायंकाळी निखिल आणि अंकिता यांचा फोनवर वाद झाला. निखिल जेव्हा घरी पोहचले तेव्हा अंकिता ओढणीच्या सहाय्याने छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. अंकिताला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता अंकिताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंकिताने आत्महत्या केल्याने निखिल यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर निखिल यांनीही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. निखिल आणि अंकिता यांच्यामध्ये नेमका कशावरून वाद झाला याच कारण अद्याप समजू शकले नाही.

bottom of page