top of page

हृदयद्रावक ! भरधाव कारने १७ महिलांना उडवलं: ५ महिलांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

पुणे-नाशिक महामार्गावर सोमवारी ( १३ फेब्रुवारी ) रात्री भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात कारने १७ महिलांना धडक दिली आहे. या धडकेत ५ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ महिला जखमी झाल्या. राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात हा अपघात झाला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त महिला या एका मंगल कार्यालयात कामासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या होत्या. त्याचवेळी भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या महिलांना रस्ता ओलांडताना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले . दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.




bottom of page