top of page
Writer's pictureMahannewsonline

सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रक-टँकरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार

पुणे : सोलापूर-पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये पाचजण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास भिमानगर येथे हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना टेंभुर्णी व इंदापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक जवळपास २ तास ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीमानगर येथे एका बाजूने महामार्गाचे दुरुस्ती काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक चालू आहे. मळी भरलेला टँकर (एमएच १४ सीपी - ४०२०) हा पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. तांदूळ घेऊन भरलेला ट्रक (एमएच २५ यू- ४०४५) सोलापूरहून पुण्याचा दिशेने निघाला होता. भिमानगर येथील एका धाब्याजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले आहेत. अपघातातील दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर ट्रक महामार्गावर आडवा पडल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. रोडच्या दुतर्फा दीड ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले.



bottom of page