top of page
Writer's pictureMahannewsonline

....विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून काढली धिंड

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील शिक्षकानं विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी आज या शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून धिंड काढली असून पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिजित पवार असे या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकारामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अंतर्गत मूल्यांकनाच्या माध्यमातून गुण देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली. याचाच गैरफायदा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या शिक्षकानं घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील अभिजित पवार या शिक्षकाने बारावीच्या एका विद्यार्थिनीकडे "बारावीच्या परीक्षेत तुला गुण वाढवून देतो," असं सांगून सदर मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली. तो वारंवार अशा प्रकारे मागणी करत असल्यामुळे त्रस्त होऊन विद्यार्थिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मात्र, नकार देऊन देखील तो फोन करून देखील तशी मागणी करु लागला. अखेर या होणाऱ्या त्रासाला कंटाळून सदर विद्यार्थिनीने अभिजित पवारने केलेला फोनकॉल रेकॉर्ड केला आणि आपल्या पालकांना, तसेच नातेवाईकांना ऐकवला.

त्यानंतर संतप्त झालेले पालक, नातेवाईक यांनी थेट महाविद्यालयात गाठले. आणि अभिजित पवार याची चांगलीच धुलाई केली. तसेच, त्याच्या तोंडाला शाई फासून त्याची महाविद्यालयातून थेट विश्रामबाग पोलीस स्थानकापर्यंत धिंड काढण्यात आली. पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



bottom of page