top of page
Writer's pictureMahannewsonline

धक्कादायक! पुण्यात तेराव्या मजल्यावरून वेटरने ...

पुणे: शहरातील मुंढवा परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या वेटरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे या वेटरचे नाव आहे. त्याने हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला आला होता. या ठिकाणी वेटरचे काम तो करत होता. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो हॉटेलच्या टेरेसवर (तेराव्या मजल्यावर) गेला. त्या ठिकाणी जाऊन त्याने फेसबुक लाइव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला व त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले. त्यानंतर अरविंद सिंह याने तेराव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अरविंद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


bottom of page