top of page
Writer's pictureMahannewsonline

धक्कादायक : आईची हत्या करून इंजिनिअर मुलाने केली आत्महत्या

पुणे : पुण्यात ४२ वर्षीय इंजिनिअर मुलाने आपल्या ७६ वर्षीय आईला औषधांचा ओव्हरडोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून केला खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शहरातील सहकारनगर परिसरात घडली आहे. गणेश मनोहर फरताडे असे मुलाचे नाव असून निर्मला मनोहर फरताडे आईचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे व आपली आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये रहात होते. ग़णेश हा इंजिनिअर होता. पण त्याचा त्याची नोकरी गेल्याने त्याच्या हाताला काहीच काम नव्हतं. ५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यांच्या आजारपणात खूप पैसा खर्च झाला होता. त्याच्या आईचे वय झाल्याने ती सतत आजारी असायची, आईच्या औषधावर होणारा खर्च व नोकरी नसल्याने त्याला खूप कर्जही झाले होते. या कारणामुळे तो निराश झाला होता. त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने १ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास आईला गोळ्यांचा ओव्हर डोस दिला. त्यामुळे आई निपचित पडली. त्यानंतर आईच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घातली आणि दोरीने गळा देखील आवळला यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर गणेशने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी "मी आत्महत्या करत आहे", असा मेसेज त्याने नातेवाईकांना पाठविला होता.


bottom of page