top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे महापालिकेनं घेतला महत्वपूर्ण निर्णय

पुणे: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून मुंबई व पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळत असल्यानं पुणे महापालिकेनं जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

कोरोनाबाधितांची संख्या याच गतीनं वाढत राहिल्यास येणाऱ्या काळात उपचारांच्या सुविधा कमी पडू शकतात. हे लक्षात घेऊन जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. पुण्यात एकूण २३ हजार सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ८५ टक्के रुग्ण स्वत:च्या घरी विलगीकरणात आहेत.गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवण्यात येईल. त्यासाठी खासगी रुग्णालयांनी आधीप्रमाणे सहकार्य करावे. पुण्यात लॉकडाऊन नसेल मात्र आणखी कडक निर्बंध काय घालता येतील यावर विचार सुरू आहे,' असंही मोहोळ यांनी सांगितलं.

bottom of page