top of page
Writer's pictureMahannewsonline

भर दिवसा गोळीबार, दोघांचा मृत्यू

पुणे - सोलापूर रोडवरील उरुळी कांचन येथील हॉटेल सोनई समोर भरदिवसा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोरांवर प्रतिहल्ला देखील करण्यात आला. यामध्ये स्वागत खैरेचा मृत्यू झाला असून ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील तळवडे चौकातील हॉटेल सोनाई समोर संतोष जगताप आणि त्याचे दोन अंगरक्षक थांबले होते. तेवढ्यात एका चार चाकी वाहनातून चार ते पाच जण आले. त्यांनी संतोष जगताप च्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात संतोष गंभीर जखमी झाले. जगताप यास जखमी अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संतोषच्या सोबत असलेले खासगी अंगरक्षकांनी देखील हल्लेखोरांवर जवळील पिस्तूल मधून गोळ्या झाडल्या. यामध्ये स्वागत खैरेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घटना स्थळावरून काही मिनिटात आरोपी पसार झाले आहेत. भर दिवस घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यामध्ये संतोष जगताप यांचे दोन्ही अंगरक्षक जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत. मयत संतोष जगताप आणि मयत हल्लेखोर स्वागत खैरे या दोघांवर यापुर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.


bottom of page