top of page
Writer's pictureMahannewsonline

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई ; स्थानिक आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्या वतीनं अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. त्याचबरोबर काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

पावसाळा सुरु असताना महापालिकेने जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु केल्यानं स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यता येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढलं आहे.

आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे. पोलीस अचानक आले आणि आम्हाला घर खाली करण्यास सांगत आहेत. महापालिकेच्या वतीनं कोणतीही नोटिस आली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आमचं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आम्ही येथे ५० ते ६० वर्षांपासून राहत असून आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.


bottom of page