top of page

पुण्यात ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, २२ जण जखमी

पुण्यात आज मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. पुणे-बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर येथे हा अपघात घडला असून या घटनेमध्ये २२ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर महामार्गावरून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने २५ प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल बस जात होती. त्याच दरम्यान साखरेची वाहतूक करणार्‍या ट्रकने पाठीमागून ट्रॅव्हल बसला जोरात धडक दिली. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत,.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.



bottom of page