top of page

धक्कादायक ! माजी नगरसेवकावर भरचौकात गोळीबार, नंतर कोयत्याने सपासप वार

Updated: Sep 2

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर भरचौकात गोळीबार करण्यात आला आहे. रविवारी रात्री नानापेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. उपचारांदरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने शहरात घबराट उडाली आहे.


वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. हल्लेखोरांनी आधी परिसरातील आणि नानापेठ चौकातील वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर वनराज आंदेकर यांना एकटा असल्याचे पाहून त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर काही कळण्याआधीच हल्लेखोरांनी पुन्हा त्यांचावर कोयत्याने सपासप वार केले . गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.


आंदेकर यांचा काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधून हल्ला केला. आधी बाइकवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्या नंतर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने केएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारांदरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. आंदेकर यांच्यावर जवळच्याच व्यक्तीने गोळीबार केला असल्याची माहिती मिळत आहे.



bottom of page