Video: जेवण देण्यास नकार; मद्यधुंद चालकाने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवला
पुणे : हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या मद्यधुंद चालकाने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवला. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे कारसह हॉटेलचे नुकसान झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणे-सोलापूर या महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव परिसरात एका हॉटेलवर एक कंटेनर( MH 12 RN 4359)चा चालक रात्रीच्यावेळी जेवणासाठी थांबला. मात्र, हॉटेल बंद झाल्याचं कारण सांगत हॉटेलच्या मालकाने त्यास जेवण देण्यास नकार दिला. याचा राग ट्रक चालकाला आला आणि संतप्त झालेल्या ट्रक चालकाने रागाच्या भरामध्ये कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवला.
या ठिकाणी उभा असलेल्या दुचाकी आणि कारला कंटेनरने धडक देत नुकसान केलं. या घटनेनंतर संबंधित ट्रक चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी या सर्व घटनेचा थरार मोबाईलमध्ये कैद केला. यानंतर या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Recent Posts
See Allराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली आज यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार...