आता पुण्याहून कोकणात 55 तर गोव्याला 75 मिनिटांत पोहोचता येणार
पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 31 ऑगस्टपासून पुण्याहून सिंधुदुर्गासाठी विमान सेवा सुरू होत आहे. त्याचबरोबर गोव्याच्या विमान सेवेचा विस्तार होत आहे. त्यामुळं पुणेकरांना आता अवघ्या 55 मिनिटांत कोकणात तर 75 मिनिटांत गोव्यात पोहोचता येणार आहे.
उडानअंतर्गंत शनिवारी आणि रविवारी या दोन्ही शहरांसाठीची सेवा सुरू होत असून ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू झाली आहे. यामुळे सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
अशा आहेत विमानसेवेच्या वेळा
सिंधुदुर्ग
फ्लाइट (आयसी ५३०२) → पुण्याहून सकाळी ८ वाजून ०५ मिनिटांनी →सिंधुदुर्गला सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
फ्लाइट (आयसी ५३०३) → सिंधुदुर्गहून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी → पुण्याला १० वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
गोवा
फ्लाइट (आयसी १३७५) → पुण्याहून सकाळी १० वाजून ५५ उड्डाण → गोव्याला सकाळी १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
फ्लाइट (आयसी १३७६) → गोव्याहून सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी उड्डाण → पुण्याला सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.