top of page
Writer's pictureMahannewsonline

पुण्यातील निर्बंध येत्या सोमवारपासून आणखी शिथिल

पुणे- पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे सोमवारपासून पुण्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पुण्यातील निर्बंध येत्या सोमवारपासून आणखी शिथिल होत आहेत. दुकाने आता 7 वाजेपर्यंत सुरु करण्यास मुभा देण्यात येणार आहेत. तसेच रेस्टारंट, हॉटेल 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मॉल सोमवारपासून सुरु ठेवता येतील. तसेच अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यात येतील. असे असले तरी चित्रपट गृहे, नाट्यगृहे बंदच राहतील. अशी माहिती पवार यांनी दिली. हे नवे नियम सोमवारपासून लागू होतील.

सोमवारी मॉल बाबत नियमावली जाहीर करण्यात येईल. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील, हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरू राहील. पुण्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुरू केली जाणार नाहीत. अभ्यासिका, वाचनालय सुरू केले जाणार आहेत, असं अजित पवार म्हणाले. असे असले तरी लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पिंपरी चिंचवडचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वरती असल्याने तेथील निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास इतर ठिकाणीही निर्बंध शिथिल करण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले.


bottom of page