top of page
Writer's pictureMahannewsonline

सलमानचा बहुप्रतिक्षित चित्रपट "राधे" डिजिटल प्लॅटफॉर्मवर; कधी, कुठे आणि कसा पाहू शकता ?


सलमान खानचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित असा 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट आज (१३ मे) प्रदर्शित होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपटाचं डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. भारतातील प्रेक्षकांना 'झीप्लेक्स' Zeeplex या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहण्यासाठी रिलीज होणार असून प्रत्येक वेळा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. हा चित्रपट डाऊनलोड करता येणार नाही. Zee5 अ‍ॅपवर हा सिनेमा मे ला दुपारी १२ वाजता रिलीज होणार आहे.

ईदच्या एक दिवस आधी म्हणजेच आज (१३ मे) दुपारी १२ वाजता सलमानचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतात झी5, झीप्लेक्स आणि झी वाहिनीवर पैसे भरून प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. यासाठी जवळपास तुम्हाला २४९ रुपये भरावे लागतील. हा सिनेमा झी5, झी प्लेक्स, डिश टीव्ही, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीवरही पाहता येणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना Zeeplex चा पर्याय निवडावा लागेल. त्यात चित्रपटासाठी ठरवलेले पैसे भरून तो पाहता येईल. जे प्रेक्षक झीप्लेक्सवर 'राधे'साठी पैसे भरतील त्यांना वर्षभराचा झी 5चा सबस्क्रीप्शन ४९९ रुपयांत मिळणार आहे.


'राधे' परदेशातील अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवाने केलं आहे. यामध्ये सलमान खानसोबतच दिशा पटानी, रणदीप हुडा, गौतम गुलाटी, जॅकी श्रॉफ, सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात सलमान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, या सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सलमानने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांकडे एक कमिटमेंट मागितली आहे. “एक सिनेमा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. खूप दु:ख होतं जेव्हा लोक पायरसी करून सिनेमा पाहतात. मी तुम्हा सर्वांकडून एक कमिटमेंट मागतो की योग्य प्लॅटफॉर्मवर योग्यरित्या सिनेमा एन्जॉय करा. तर ही आहे प्रेक्षकांची कमिटमेंट..नो पायरसी इन एंटरटेनमेंट” असं तो म्हणाला.


bottom of page