top of page

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज!

आता रेल्वे प्रवास होणार नाही कंटाळवाणा

रेल्वे मंत्रालयाकडून बहूप्रतीक्षेत असलेली कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वेचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली.



कंटेंट ऑन डिमांड या सेवेअंतर्गत धावत्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना त्यांच्या डिव्हाइसवर (मोबाइल किंवा अन्य उपकरण) विविध भाषांमध्ये चित्रपट, बातम्या, म्युझिक, व्हिडिओ आदींचा आनंद घेता येईल. महत्वाचे म्हणजे प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये यासाठी रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवलं जाणार आहे. मीडिया सर्व्हरमुळे प्रवाशांना धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाइसमध्ये हाय क्वालिटी बफर फ्री स्ट्रीमिंगची सेवा मिळेल.


ही सेवा 5 हजार 723 उपनगरी रेल्वेसह(लोकल), 8 हजार 731 ट्रेन आणि वाय-फाय असणाऱ्या 5 हजार 952 रेल्वे स्थानकांवर सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर एका राजधानी एक्सप्रेस आणि एका एसी लोकलमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात असून चाचणी सुरू आहे.

bottom of page