top of page
Writer's pictureMahannewsonline

रेल्वे मंत्रालयाने घेतला महत्वाचा निर्णय

लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रात्रीच्या वेळी रेल्वे गाड्यांमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या ( मोबाईल, लॅपटॉप) चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची माहिती मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयानुसार, रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रेल्वेतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीही रेल्वे बोर्डाने असे आदेश जारी केले होते. त्यामुळे प्रवाशांना आता रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत. रात्रीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांना मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करून निघावे लागणार आहे.


bottom of page