top of page
Writer's pictureMahannewsonline

पुढील 5 दिवसात मुंबई सह कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा!

मुंबई : मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून पुढील ५ दिवसात मुंबईसह कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान विभागाने १३ व १४ जून या कालावधीदरम्यान मुंबई अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.


मुंबईतील समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पालिकेने नियंत्रण कक्षांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरात रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. तर, मुंबई व कोकण किनारपट्टीस अतिवृष्टीचा देखील इशारा दिलेला आहे. आज सकाळपासून मुंबईत अंधेरी, दादर, सायन,अंधेरी, मानखुर्द, कुर्ला, परळ, कुर्ला या ठिकाणांसह पश्चिम उपनगरात पाऊस सुरू आहे. अनेक भागांमधील रस्त्यांवर पाणी साचले. वसई, विरार, नालासोपाऱ्यात रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने शहरातील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले असल्याने वाहनाचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


bottom of page