top of page

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावरून मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट करत अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली. त्याचबरोबर पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शविला होता. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या असं ब्रिजभूषण सिंग म्हणाले होते. मात्र आता प्रकृतीसंदर्भातील कारणामुळे तुर्तास राज यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय. याबाबत २२ ला पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे भाष्य करतील भूमिका मांडतील असे संकेत राज यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिलेत.

राज यांनी ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित’ अशी पोस्ट ट्विटरवरुन केलीय. ‘महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच… रविवारी दिनांक २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे’ येथे असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.


bottom of page