top of page
Writer's pictureMahannewsonline

साताऱ्यात राडा; शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थक भिडले

साताऱ्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खा. उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये जोरदार सशस्त्र राडा झाला. राजे समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली. या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मारामारीत ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मारामारी झाल्यावर रुग्णालयाच्या परिसरात समर्थक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, घटनेनंतर परिसरासह खासगी हॉस्पिटल बाहेर तणावाचे वातावरण आहे.

बुधवारी संध्याकाळी साताऱ्यात रात्री सव्वा आठच्या आसपास सनी भोसले हा त्याच्या मित्रांसमवेत दुर्गा पेठेत गेला होता. याच ठिकाणी बाळासाहेब खंदारे यांचे कार्यालय आहे. कार्यालयासमोरच गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मारामारीत शस्त्रांचा वापर झाल्याची चर्चा आहे.


बाळू खंदारे, शैलेश बडेकर, शुभम भिसे, निखिल किर्तीकर, आकाश नेटके यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयितांनी कोयता, गुप्ती, रॉड याचा हल्ल्यासाठी वापर केला. पिस्तुलचा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



bottom of page