top of page
Writer's pictureMahannewsonline

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं निधन

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे. ३० जून रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २७ जूनला राज आणि मंदिराने त्यांच्या मित्र परिवारासोबत पार्टी एन्जॉय केली होती. त्यानंतर राज यांच्या निधनाची अचानक बातमी आल्याने बॉलिवूडसह सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलंय. १९९९ साली दिग्दर्शक आणि निर्माते असलेल्या राज कौशल व मंदिरा बेदी यांचे लग्न झाले होते. मंदिरा आणि राज यांना वीर नावाचा एक मुलगा आहे. तर राज कौशल यांनी २०२० साली एका मुलीला दत्तक घेतलं असून तिचं नाव त्यांनी तारा असं ठेवलं होतं.


bottom of page