top of page
Writer's pictureMahannewsonline

"हे पळपुटे सरकार आहे... यांना सामान्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही"

मुंबई : आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भाजप आमदार राम सातपुते यांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. स्वप्निल लोणकर आत्महत्याप्रकरणावरून आक्रमक होत सातपुते यांनी एमपीएससी परीक्षेवरुन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकारला केवळ रोहित पवार, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. राज्यातील गोर गरिब पोरांची चिंता नाही, अशी टीका करताना सरकार काय करतंय ? असा सवाल राम सातपुते यांनी यावेळी विचारला आहे.

पुण्यातल्या स्वप्निलच्या आत्महत्येला हे सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करतात आणि सरकार विद्यार्थ्यांना अशाप्रकारे वागवतं ही खूपच वाईट गोष्ट आहे. मी सरकारच्या तोंडावर एमपीएससी (MPSC) चे पुस्तक फेकणार आहे. भाषणबाजीत केवळ शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या विचारांना हरताळ फासायचं. आज अनेक विद्यार्थी परीक्षेच्या, मुलाखतीच्या, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. हे सरकार नेमकं काय करतंय, हे पळपुटे सरकार आहे... यांना सामान्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही, यांची वसुली चालली पाहिजे. वाझेसारखे अधिकारी जगले पाहिजे, नि सामान्य विद्यार्थी मेले पाहिजेत हे या सरकारचे धोरण आहे., असं राम सातपुते म्हणाले.

स्वप्निलसारख्या कित्येक मुलांच्या मुलाखती रखडल्या आहेत. सरकार काय करतंय? यांना फक्त आदित्य ठाकरे, पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याच भविष्याची चिंता आहे. स्वत:ची लेकरं-बाळं आमदार खासदार व्हायला हवीत इतकंच या नेत्यांचे धोरण आहे. पण कष्टकरी जनतेच्या पोरा-बाळांची त्यांना चिंता नाही", अशा शब्दात राम सातपुते यांनी सरकारच्या कार्यपद्धतीबाबत निषेध नोंदवला.


bottom of page