top of page
Writer's pictureMahannewsonline

नारायण राणेंना मुंबई महापालिकेची नोटीस

नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतं आहे. शिवसेना आणि भाजपा एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई महानगरपालिकेनं नोटीस पाठवली आहे. नारायण राणे यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. त्याचा तपास करण्यासाठी पालिकेनं ही नोटीस बजावली आहे.

राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली आहे. या पूर्वी तक्रार करूनही महापालिकेनं कारवाई केली नसल्याचं दौंडकर यांनी महापालिकेला कळवलं आहे. त्यानंतर पालिकेनं राणेंना नोटीस पाठवली आहे. तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचं तक्रारीत म्हंटलं आहे.

महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचे पथक आज बंगला आणि परिसराची पाहणी करून मोजमाप करेल तसेच त्याचे फोटो काढतील. ज्यावेळी पालिकेचं पथक तपासणीसाठी येईल त्यावेळी तुम्ही बंगल्याची कागदपत्र घेऊन तिथं हजर राहा, असं या नोटीशीमध्ये म्हंटलं आहे..


bottom of page