top of page
Writer's pictureMahannewsonline

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार : यादी जाहीर; महाराष्ट्रातील चौघांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी सुरू होत्या. मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात धाकधूक वाढली होती. मात्र, अखेर यावरील पडदा दूर झाला असून मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील नारायण राणे यांचं नाव आघाडीवर होतं. त्याचबरोबर हिना गावित, भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील, प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं होतं. मात्र, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार याविषयीची संदिग्धता कायम होती. सरकारकडून यादी जाहीर करण्यात आली असून, मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.


मोदींच्या मंत्रिमंडळात यांची लागली वर्णी…

नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, भुपेन्द्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, अनुप्रिया सिंह पटेल, डॉ. सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडलाजे, भानूप्रताप सिंग वर्मा, दर्शना विक्रम जरदोष,मीनाक्षी लेखी,अनपुर्णा देवी,ए. नारायण स्वामी,कौशल किशोर,अजय भट्ट,बी. एल. वर्मा,अजय कुमार,चौहाण देवूसिंह,भागवत खुपा, कपिल पाटील,प्रतिमा भौमिक,डॉ. सुभाष सरकार,डॉ. भागवत कराड, डॉ. राजकुमार सिंह,डॉ. भारती पवार,बिस्वेश्वर तडू,शंतनु ठाकूर,डॉ. मुंजपारा महेंद्रभाई,जॉन बरला,डॉ. एल. मुरगन, निसित प्रमाणिक


केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धनसह रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचाही समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेत. यामध्ये महाराष्ट्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील आणि भाजपाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचा समावेश आहे. दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी होती. तर राज्यमंत्री धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी होती.

bottom of page