top of page
Writer's pictureMahannewsonline

पुणे विदयापीठाच्या ग्रंथालय शास्त्र परीक्षेत सोलापूरची रवीनिशा चिंचोलकर सर्वप्रथम

सोलापूर -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस ( M.L.I.Sc.)या अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये सोलापूर येथील रवीनिशा रवींद्र चिंचोलकर या विद्यार्थिनीने सर्वाधिक गुण मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला आहे .

23 जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहिती शास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या दोन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये रवीनिशा रवींद्र चिंचोलकर या विद्यार्थिनीने 10 सी.जी.पी.ए. पैकी 9. 63 ग्रेड गुण मिळवित सर्व प्रथम क्रमांक पटकावला आहे . सर्वच विषयात तिने आउटस्टँडिंग श्रेणी प्राप्त केली आहे . विशेष म्हणजे चार सत्राच्या या अभ्यासक्रमात चारही सत्रात रवीनिशा चिंचोलकर हिने प्रथम क्रमांक मिळवित आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे . रवीनिशा चिंचोल्कर हिचे माध्यमिक शिक्षण सोलापूरच्या मॉडर्न शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर महाविदयाालयात झाले. यशाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालय शास्त्र विभागाचे संचालक प्रा सदानंद बनसोडे , प्रा. राजेंद्र कुंभार, प्रा. शुभदा नगरकर इत्यादींनी अभिनंदन केले आहे .रवीनिशा चिंचोलकर ही पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर यांची कन्या आहे .


bottom of page