top of page
Writer's pictureMahannewsonline

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँके(निलंगा) चा बँकिंग परवाना रद्द करण्यात आली असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. त्याचबरोबर बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि रक्कम काढण्यावर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत.

आरबीआय व्यतिरिक्त सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनीही महाराष्ट्रातील ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी केले आहेत. सध्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आहे. हे बँकिंग नियमन कायदा 1949 च्या तरतुदीनुसार नाही. बँक ग्राहकांसाठी सुरू राहणं योग्य नाही. बँकेला व्यवसाय वाढविण्याची परवानगी दिली तर त्याचा परिणाम ग्राहकांवर आणि सामान्य लोकांवर होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.


bottom of page