top of page
Writer's pictureMahannewsonline

पुण्यातील "या" सहकारी बँकेचा परवाना रद्द; आरबीआयची कारवाई

पुणे : रिझर्व्ह बँके (आरबीआय) ने पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर कारवाई करत बँकेचा परवाना रद्द केला आहे. सहकार विभागाने केलेली शिफारस आणि पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत यांसह विविध आर्थिक अनियमितांवर बोट ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. ही बँक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच त्यांच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार ही बँक विविध निकषांची पूर्तता करु शकत नाही. अनेक आर्थिक अनियमतताही असून, बँक आपल्या ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या हिताचा विचार करून बँकेला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देता येत नाही, आदी नियमांनुसार रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली आहे. बँक लिक्विडेशनमध्ये काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली आहे. विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या बँकेच्या ९८ टक्के ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


bottom of page