top of page
Writer's pictureMahannewsonline

आणखी एका बँकेचा परवाना रद्द

नवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अमरावती जिल्ह्यातील "भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड" या बँकेचा परवाना रद्द केला आहे. ठेवीदारांच्या ठेवींची परतफेड करण्यास बँक सक्षम नसल्याने तसेच बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार 98 टक्के ठेवीदारांना पूर्णतः परतावा देण्यास बँक सक्षम आहेत. परतावा डिपॉझिट इन्श्यॉरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन करेल. लिक्विडेशन झाल्यास प्रत्येक ठेवीदारास ठेवी विम्याच्या दाव्यांतर्गत 5-5 लाखांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. हे DICGC कायदा 1961 च्या तरतुदीखाली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 मधील अनेक तरतुदी पूर्ण करू शकत नसल्याने भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या बँकिंग व्यवसायावर 23 एप्रिलपासून बंदी घालण्यात आली असून परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही रिझर्व्ह बँकेने म्हटले.



bottom of page