top of page
Writer's pictureMahannewsonline

जुन्या नोटा आणि नाण्यांसंदर्भात आरबीआय (RBI) कडून अलर्ट जारी

नवी दिल्लीः जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी आणि विक्रीसंदर्भातील बातम्या सोशल मिडीयावर अनेक जण शेअर करत आहेत. तुमच्याकडे असे नाणे किंवा नोट असेल तर तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. आरबीआय (RBI) ने अशा बातम्यांसंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून ग्राहकांना त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. जुन्या नोटा किंवा नाण्यांची खरेदी विक्रीच्या बनावट ऑफरला बळी पडू नये, असंही आरबीआयनं स्पष्ट केलंय.

खरं तर काहीजण आरबीआयच्या नावाने सामान्य लोकांकडून वेगवेगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून फसवणुकीद्वारे जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी आणि विक्रीशी संबंधित व्यवहारांमध्ये शुल्क किंवा कमिशनची मागणी करत आहेत. अशा जाळ्यात सामान्यांनी अडकू नये, असे आरबीआयने स्पष्ट केलेय.

आरबीआय जुन्या नोटा किंवा नाणी विकण्यासारख्या कोणत्याही व्यवहारात सामील नाही आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन किंवा पैसे घेत नाही. आरबीआय (RBI) ने एका ट्विटद्वारे सांगितले आहे की, आरबीआयच्या कोणत्याही सदस्याला, कर्मचाऱ्याला किंवा कंपनीला किंवा संस्थेला अशा व्यवहारांसाठी अधिकार देण्यात आलेले नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने लोकांना अशा बनावट आणि फसव्या ऑफरच्या जाळ्यात न पडण्याचा सल्ला दिला.


bottom of page