top of page

येत्या दीड वर्षात मिळणार १० लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींनी दिल्या सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी यांनी येत्या दीड वर्षात सुमारे १० लाख पद भरती करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. आज (मंगळवार) सकाळी पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मोदी सरकारचा हा निर्णय रोजगार शोधणाऱ्या तरुणांना दिलासा देणारा आहे.

गेल्या वर्षी राज्यसभेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता हा आकडा साधारण १० लाखांच्या आसपास गेला असेल. केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे ३१ लाख ३२ हजार कर्मचारी नियुक्त आहेत.

नोटाबंदी, जीएसटी आणि नंतर कोरोना या काळात अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावल्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मोदी सरकारची ही घोषणा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.




bottom of page