top of page
Writer's pictureMahannewsonline

... अखेर 'त्या' ८ जणांचे मृतदेह सापडले

अमरावती : अमरावतीमधील बोट दुर्घटनेत तब्बल ११ जणांना जलसमाधी मिळाली होती. घटनेच्या दिवशी ३ जणांचे मृतदेह सापडले होते तर बेपत्ता असलेल्या ८ जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती समोर येत आहे. एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सर्व मृतांचे शवविच्छेदन नदी पात्रालगतच घटनास्थळी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे गाडेगावचे मटरे कुटुंब व त्यांचे नातेवाईक दशक्रिया विधी आटोपल्यानंतर या कुटुंबातील लोक नाव (बोटीत) बसून नदीत पात्रात फिरत होते. मात्र, बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने बोट उलटली झाली. यात १३ जण बुडाले होते दोघांना पोहता येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या अपघातामध्ये तब्बल ११ जणांना जलसमाधी मिळाली होती. घटनेच्या दिवशी ३ जणांचे मृतदेह सापडले होते तर बेपत्ता असलेल्या ८ जणांचे मृतदेह सापडले आहे.

मृतदेह शोधण्यासाठी NDRF, SDRF व जिल्हा शोध व बचाव पथकांनी वर्धा नदी पात्रातील जवळपास ३५ किलोमीटर परिसर छाणून काढला होता. मात्र, आज सकाळी टप्प्या टप्प्याने सर्व ८ जणांचा मृतदेह सापडल्याने शोध मोहीम थांबली आहे.


bottom of page