top of page
Writer's pictureMahannewsonline

... आणि राहुल गांधींनी प. बंगालमधील सर्व सभा केल्या रद्द

देशात सर्वत्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून निवडणुकांचा प्रचारही धूमधडाक्यात सुरू आहे. त्याकरिता सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा घेतल्या जात असताना आज राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

देशात मागील २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित आढळले असून राहुल गांधी यांनी सर्व राजकीय नेत्यांना अशा परिस्थितीत गर्दी करत प्रचारसभा घेण्यासंबंधी विचार कऱण्याचं आवाहन देखील केलं आहे.


“करोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याच्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा”. असं राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितलं आहे.


दरम्यान राहुल गांधी यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर काँग्रेस नेत्यांकडून स्वागत करण्यात येत असून सर्वांसमोर एक उदाहरण ठेवत असल्याचं म्हटलं आहे.


bottom of page