top of page
Writer's pictureMahannewsonline

ट्रॅक्टर चालवत राहुल गांधी शेतकऱ्यांसोबत संसदेत दाखल

देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांचा विरोधात वर्षभरापासून निषेध करत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालवत संसद भवनात पोहोचले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. राहुल गांधी यांचा ट्रॅक्टर संसदेच्या गेटवरच रोखण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी मी शेतकऱ्यांचा निरोप घेऊन आलो आहे, असं म्हणाले. "सरकार शेतकर्‍यांचा आवाज दाबत आहे आणि संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. त्यांना हे काळे कायदे रद्द करावे लागतील", असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, "सरकारला वाटते की शेतकरी खूप आनंदात आहेत आणि बाहेर बसलेले (निषेध करणारे शेतकरी) अतिरेकी आहेत. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे हक्क हिसकावले जात आहेत. गेल्या एका वर्षापासून शेतकऱ्यांचा कृषी कायद्याविरोधात निषेध दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाजीपूर सीमेवर सुरू आहे. हे तीनही कायदे मागे घ्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, पण हे कायदे परत मागे घेतले जाणार नाहीत असे सरकारचे म्हणणे आहे."

राहुल गांधीं यांच्याबरोबर रणदीप सुरजेवाला, बीव्ही श्रीनिवास आणि दीपेंद्र हूडा यांच्यासह अनेक काँग्रेस नेते ट्रॅक्टरवर दिसले. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, युवा कॉंग्रेस प्रमुख बी.व्ही. श्रीनिवास आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.



bottom of page