top of page
Writer's pictureMahannewsonline

...ब्रेकफास्ट मिटींग; नंतर राहुल गांधींसह विरोधकांनी इंधन दरवाढीविरोधात काढली सायकल रॅली

नवी दिल्ली: सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून यावेळी सरकारला कोडींत पकडण्यासाठी विरोधकांकडून व्यूहरचना आखली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सर्व विरोधकांना ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं. 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली. बैठकीनंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसदेवर सायकल रॅली काढण्यात आली. राहुल गांधींसह सर्व विरोधक इंधन दरवाढीविरोधात सायकलवरून संसदकडे रवाना झाले.

पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ सुरु असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्षावरुनही विरोधक आक्रमक झाले आहेत.काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत ब्रेकफास्ट मीटचं आयोजन केलं होतं. या ब्रेकफास्ट मिटींगला 15पक्षाचे 100 खासदार आले होते. यात काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, राजद, शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, सीपीआयएम, सपीआय, आययूएमएल, आरएसपी, केसीएम, झामुमो, नॅशनल कॉन्फरन्स, आणि लोकजनशक्ती पार्टीच्या नेत्यांचा समावेश आहे. यावेळी इंधन दरवाढीविरोधात एकता दाखवण्यासाठी राहुल गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी सायकल रॅली काढली.

दरम्यान या बैठकीला आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा एकही सदस्य उपस्थित नाही.


सत्ताधारी भाजप आमचं म्हणणं ऐकून घेत नाही. त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावरची लढाई लढतानाच संसदेतही लढाई लढावी लागणार आहे. कोरोनावर चर्चा झाली आहे. तशी पेगाससवर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.



bottom of page