Video : आशियातील सर्वात श्रीमंत गाव ते ही भारतात ? ; 17 बँका अन् 7000 कोटी रुपयांच्या ठेवी
गाव म्हटलं कि लगेच आपल्या डोळ्यासमोर शेतकरी, कच्ची मातीची घर, गायी-गुरं येतात. काही गावांमध्ये मूलभूत सुविधाही नाहीत. श्रीमंत गावाचा विषय येताच आपल्या डोळ्यासमोर परदेशातील गाव येतात. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपल्याच देशात आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे. ते तुम्हाला ठाऊक आहे ?. हे गावं आहे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माधापार.. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून या गावाची ओळख आहे.
या गावात एचडीएफसी, एसबीआय, पीएनबी, अँक्सिस, आयसीआयसीआय या प्रमुख बँकासह 17 बँका आहेत.आणि अजूनही काही बँका या गावात शाखा सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. या बँकांमध्ये तब्बल 7000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यावरून या गावच्या श्रीमंतीचा आणि वैभवाचा अंदाज येऊ शकतो. माधापारच्या समृद्धीमागे येथील एनआरआय (नॉन-रेसिडेंट इंडियन) कुटुंबांचा मोठा वाटा आहे. या गावातील प्रत्येक घरातील किमान 2 लोक परदेशात राहतात. निम्म्याहून अधिक लोक लंडन आणि युरोपमध्ये राहतात. ही कुटुंबं दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्कम स्थानिक बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये जमा करतात.
Recent Posts
See Allराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली आज यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार...