top of page
Writer's pictureMahannewsonline

Video : रिंकू राजगुरुच्या ‘२०० हल्ला हो’चा ट्रेलर प्रदर्शित

सैराट’ या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकू सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती सतत चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते. रिंकू राजगुरुचा ‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘२०० हल्ला हो’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. ‘२०० हल्ला हो’ या चित्रपटाच्या १ मिनिट ५३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दलित महिलांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करण्यात आले आहे. रिंकू राजगुरुने २०० महिलांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास एकत्र आणले आहे. एकंदरीत ट्रेलर पाहाता रिंकूचा अभिनय पाहण्यासारखा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. सध्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या चित्रपटात रिंकू राजगुरुसोबत अमोल पालेकर आणि बरुण सोबती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सार्थक दासगुप्ता यांनी केले आहे. हा चित्रपट २० ऑगस्ट रोजी झी ५ या अ‍ॅपवर प्रदर्शित होणार आहे.


bottom of page