top of page
Writer's pictureMahannewsonline

रोहिणी खडसेंच्या ट्विटवरून उलटसुलट चर्चा...

मुंबई: एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी सोमवारी एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विटवरवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे. यामध्ये रोहिणी खडसे यांच्या हातात कॅमेरा दिसत आहे.

या फोटोसोबत " कॅमेरा सोबत "लेन्स" आणि माणसाकडे "सेन्स" असणं खूप गरजेच असत."जवळच" व "लांबच" नीट समजण्यासाठी !!" अशा आशयाचं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलं आहे. रोहिणी खडसे यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय यावरुन सध्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजप खासदार रक्षा खडसे यांना भेटण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी गेले होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्यांच्यात फोनवरुन संवाद झाला होता. या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीवेळी तिथे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे उदय सामंत यांनीही नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे या सगळ्यामागे काही राजकारण आहे का, याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. अशातच आता रोहिणी खडसे यांच्या ट्विटने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.



bottom of page