top of page

विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांची यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी निवडणूक मैदानात उतरले होते. या लढतीत नार्वेकर यांना १६४ मते मिळाली आहेत. तर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली.

विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरु होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांनी मांडला गिरीश महाजन यांनी त्याला अनुमोदन दिलं. महाविकास आघाडीकडून चेतन तुपे यांनी राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला संग्राम थोपटे यांनी त्याला अनुमोदन दिलं. शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाने राहुल नार्वेकरांना पाठिंबा दिला. बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधान सभा अध्यक्षपद रिक्त होते. तोपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षपदाचा कामकाज पाहत होते.

कोण आहेत राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकर यांनी शिवेसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत विधानपरिषदेत निवडून आले होते. तीन वर्ष ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या ते भाजपाचे आमदार आहेत. मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे ते आमदार आहेत.


bottom of page