top of page
Writer's pictureMahannewsonline

“खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय”

मुंबई : देशभरात पेट्रोलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होतं आहे. एकीकडे काँग्रेसकडून महागाईविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते पेट्रोल दरवाढीसाठी राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल (शुक्रवार) पुण्यात बोलतांना पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात, असे विधान केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे विधान हास्यास्पद असल्याचे म्हंटल. त्याचबरोबर "साफ खोटं" आणि "वस्तुस्थिती" असे दोन व्हिडीओ ट्विट करत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

"खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही."असा टोलाही रोहीत पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

"केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रु मिळत असल्याचे सांगतात. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही." असंही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं म्हणाले.

bottom of page