top of page

राजकारणाबरोबर आता अभिनय ही.... ; रामदास आठवले, राजू शेट्टी झळकणार 'या' मराठी चित्रपटात

राजकारण तसेच राष्ट्रभक्तीवर आधारित ‘राष्ट्र – एक रणभूमी’ हा चित्रपट कोरोनामुळे रखडला होता. अखेरीस आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या ‘राष्ट्र – एक रणभूमी’मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ‘राष्ट्र – एक रणभूमी’च्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत.

निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली ‘राष्ट्र’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रिमा लागू, संजय नार्वेकर यांसारखे मराठीमधील आघाडीचे कलाकार यामध्ये असून २६ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


bottom of page